Tuesday, December 15, 2009

An honest measure of poverty

Josy Joseph / DNA

Monday, December 14, 2009 0:26 IST

New Delhi: The growing inequalities between urban and rural India are clearly spelt in the poverty estimates drawn up by the Suresh Tendulkar Committee, which has found a new and more robust method to measure poverty. If it is accepted by the government, the below poverty line population would jump by nearly 10 crore from 27.5% to 37.2%.

The committee, chaired by renowned economist Suresh Tendulkar, was set up to make a more realistic assessment of poverty after the government faced criticism about its official estimates, which experts believe suppressed rural poverty.

According to the Tendulkar committee, 41.8% of people in rural areas live below the poverty line as against 25.7% of urban residents. The officially accepted level for rural poverty was 28.3%. It hasn't changed for urban areas.

The committee has also revised the poverty line in terms of money spent per person per month. From Rs356.30 a month, this has increased to Rs446.68 in rural areas. In urban areas it has risen from Rs538.60 to Rs578.8.

At present, the Centre measures poverty by measuring calorie intake. But the Tendulkar committee has moved away from that to a broader definition that includes spending on food as well as education, health, and clothing. It has also proposed the abolition of different criteria for rural and urban India.

The Tendulkar committee report says the National Sample Survey Organisation, which estimates the minimum household consumption, would move to a mixed reference period for its surveys in future -- meaning 365 days for low-frequency items such as clothing, footwear, durables, education, and health; and 30 days for the rest.

"The expert group decided to adopt the MRP based estimates of consumption expenditure as the basis for future poverty lines as against the previous practice of using uniform reference period estimates of consumption expenditure," the report says.
The present official poverty line baskets (PLB) were defined in terms of per capita total consumer expenditure at 1973-74 market prices and adjusted over time and across states. The government had drawn out separate PLBs for urban and rural areas, tied to the calorie intake -- 2,400 per capita calories for rural areas and 2,100 calories for urban areas. Meaning this was the calorie standard for a typical individual. The cost of food to attain this calorie level is calculated, and poverty line is estimated in rupees. According to the official data, this was Rs356.30 in rural areas and Rs538.60 in urban areas in 2004-05. Experts said that consumption patterns used to define PLBs were formed in 1973-74 and are dated.

In 1993-94 rural India had 50.1% people living below poverty and urban areas had 31.8%. The country as a whole had 45.3% people below the poverty line. The report points out that the flawed official method helped the government suppress the real picture by projecting just 37.2% poverty in India.

Today, 37.2% of people, that is over 37 crore, live below the poverty line. If the report is accepted, the government's poverty estimates would be closer to those made by the World Bank, which said 42% of Indians lived below poverty line in 2005. The bank's poverty line is pegged at $1.25 a day, or at India's PPP rate Rs21.6 a day in urban areas and Rs14.3 a day in rural areas.

According to the Tendulkar committee, the poverty line for rural India would work out to Rs446.68, while for urban areas it would be Rs578.8.

धान्‍यापासून दारु करण्‍याच्‍या निर्णयाला विरोध करणारे प्रथितयशांचे पत्र

ठाकूरदास बंग, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अण्णा हजारे, डॉ. अनिल अवचट, डॉ. अभय व डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे सोमवार, १४ डिसेंबर २००९ रोजी लोकसत्‍तेत प्रसिद्ध झालेले पत्र

या अगोदर सहकारी साखर कारखान्यातून व नंतर द्राक्षापासून दारू बनविण्याचे कारखाने राजकीय नेत्यांनीच सुरू केले आहेत. ते कमी झाले की काय म्हणून आता अन्न-धान्यांवरही त्यांची नजर गेली आहे..दारूसम्राटांच्या हातात महाराष्ट्र राज्य जात असून जनतेला दारू पिणे, कर भरणे व दारूच्या नशेत मत देणे या भूमिका उरतात.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने ज्वारी, मका, बाजरी या प्रकारच्या अन्न धान्यांपासून दारू बनविण्याच्या २३ कारखान्यांच्या प्रस्तावांना नुकतीच मंजुरी दिल्याची बातमी प्रकाशित झाली आहे. यावर्षी अशा तीन कारखान्यांना अगोदरच मान्यता देण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यापैकी अनेक कारखाने हे मंत्री आणि राजकीय नेत्यांचे असून शासकीय तिजोरीतून या कारखान्यांना प्रत्येकी २० कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. शिवाय यातून निर्माण होणारी दारू बाजारातील स्पर्धेत यशस्वी व्हावी म्हणून त्या दारूवर शासन प्रति लिटर पाच ते १० रुपये सबसिडी देणार आहे.
या शासकीय निर्णयांचे संभाव्य दुष्परिणाम चार प्रकारचे आहेत.
१) महाराष्ट्रात ३६ टक्के मुले कुपोषित असून त्यांना पुरेसे अन्न मिळत नाही. राज्यात सध्याच दुष्काळी स्थिती आहे. यावर्षी धान्याचे राष्ट्रीय उत्पादन कमी होणार आहे, अशी धोक्याची सूचना केंद्रीय कृषी व अन्न पुरवठा मंत्र्यांनी जाहीररीत्या दिली आहे. अन्नधान्यांचे भाव अगोदरच वाढलेले आहेत. त्यामुळे राज्यातील गरीब तसेच मध्यमवर्गीयांना अन्नटंचाई भोगावी लागते आहे. गेल्या वर्षी जगभरात धान्याचा तुटवडा व भाववाढ झाली आणि त्यामुळे काही देशात धान्यासाठी दंगली झाल्या. यामागचे प्रमुख कारण हे मानले जाते की, अमेरिकेने मका मोठय़ा प्रमाणात जैव-इंधन बनविण्यासाठी वळवला. महाराष्ट्रातले धान्य दारूसाठी वापरणे हे तशाच प्रकारचे पाऊल ठरेल. शिवाय या कारखान्यांना कच्चा माल म्हणून धान्य वर्षानुवर्षे लागणार आहे. दारू कारखान्यांना पाणी व वीज लागते. महाराष्ट्रात अगोदरच पाण्याची कमतरता असून पाण्याचे दुर्भिक्ष्य हे भविष्यात वाढणार असल्याचा जागतिक धोका वारंवार सांगण्यात आलेला आहे. अन्न व पाणी या लोकांच्या जगण्याच्या प्रश्नथमिक गरजा आहेत. दारू नाही. म्हणून कुपोषित मुले व पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या राज्यातील धान्य व पाणी दारू उत्पादनाकडे वळविणे लोकहितासाठी घातक आहे.
२) या प्रस्तावित कारखान्यांमधून निर्माण होणारी दारू हा नशा, रोग, व्यसन व मृत्यू निर्माण करणारा पदार्थ आहे. त्यामुळे जवळपास ८० प्रकारचे रोग निर्माण होतात व मृत्यूचे प्रमाण वाढते. दारूच्या नशेत अपघात, आत्महत्या, स्त्रियांना मारझोड, अनैतिक व अविवेकी वर्तन व एड्सची वाढ होते. दारूच्या नशेत कायदेशीर व जबाबदार व्यवहार करता येत नाहीत.
एकदाच दारू पिणाऱ्यांपैकी १५ ते २५ टक्के माणसे ही दारूची व्यसनी होतात, असे याबाबतचे जागतिक संशोधन सांगते. अशांचा १५ ते २० वर्षे लवकर मृत्यू होतो. शिवाय व्यसनी माणसाच्या कुटुंबीयांसह सर्व संबंधितांना गंभीर त्रास होतो. व्यसन सोडविण्यावर हमखास असा वैद्यकीय उपाय नाही. उपचारानंतरही अशी माणसे पुन्हा व्यसनाला बळी पडतात. समाजात मुबलक दारू उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वाच्याच जगण्याच्या व कल्याणाच्या मूलभूत अधिकारावर गदा येते.
म्हणून जागतिक आरोग्य संघटना तसेच इंग्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स यांची शिफारस आहे की, समाजातील दारू उत्तरोत्तर कमी करत नेण्याची सामाजिक व प्रशासकीय नीती असावी. सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये महाराष्ट्र शासन विरुद्ध नागपूर डिस्टिलर्स या केसच्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे की, घटनेच्या ४७ व्या कलमानुसार समाजातील दारू कमी करून अंतत: दारूबंदी करणे ही राज्य सरकारची दिशा असावी. महाराष्ट्र शासनाचे पाऊल त्याविरुद्ध आहे. दारूचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दारूची उपलब्धी कमी करणे व दारूचे भाव वाढवणे हे सर्वात यशस्वी उपाय आहेत. महाराष्ट्र शासन नेमके या उलट वागते आहे. दारूची उपलब्धी वाढवते आहे व ती स्वस्त विकण्यासाठी त्यावर अनुदान देणार आहे.
३) दारूमुळे पिणाऱ्याची उत्पादकता कमी होते. कामावरून गैरहजर राहण्याचे प्रमाण तिपटीने वाढते. सोविएत युनियनसारख्या देशांमध्ये दारूमुळे आर्थिक विकासात गंभीर बाधा निर्माण झाली होती, हा ताजा इतिहास आहे. अविकसित देशांचे मानवी भांडवल यामुळे नष्ट होते म्हणून दारू ही देशाच्या आर्थिक विकासाला घातक आहे, असा वर्ल्ड बँकेचा अहवाल आहे. दारूमुळे शासनाला मिळणाऱ्या करापेक्षा होणाऱ्या आर्थिक, सामाजिक व वैद्यकीय दुष्परिणामाची किंमत अनेक पटींनी जास्त आहे, असा हिशेब तज्ज्ञांनी केला आहे.
महाराष्ट्रात धान्यांपासून दारूच्या प्रस्तावित कारखान्यांना व दारूला शासकीय अनुदान दिले जाणार असल्याने त्यापासून कर रूपाने उत्पन्न तर नाहीच, उलट राज्यातील जनतेवर त्याचा कोटय़वधी रुपयांचा आर्थिक भार पडेल. या कारखान्यांमुळे शेतमालाला वाढीव भाव मिळेल, ही अपेक्षा खरी ठरण्याची शक्यता नाही, कारण धान्याचे भाव निव्वळ एका राज्यात ठरत नाहीत. जागतिकीकरणामुळे जगभरातून स्वस्त धान्याची आयात होऊन धान्याचे भाव पाडले जातील. धान्यापासून निर्मित दारू प्रश्नमुख्याने परत शेतकरीच पिणार. शेतकऱ्यांकडून ज्वारी विकत घेऊन त्यांना अनेक पटींनी महाग अशी घातक दारू विकत देण्याऐवजी या कारखान्यांना व दारूला प्रस्तावित अनुदानाची रक्कम सरळ शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावी. म्हणजे शेतकऱ्यांना पैसाही मिळेल व दारूचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार नाहीत. पण शासन हे करणार नाही. कारण राजकीय नेत्यांना या व्यवहारापासून स्वत:चा फायदा करून घ्यावयाचा आहे.
४) या अगोदर सहकारी साखर कारखान्यातून व नंतर द्राक्षापासून दारू बनविण्याचे कारखाने राजकीय नेत्यांनीच सुरू केले आहेत. ते कमी झाले की काय म्हणून आता अन्न-धान्यांवरही त्यांची नजर गेली आहे. या प्रस्तावित कारखान्यांच्या प्रस्तावकांमध्ये अनेक राजकीय नेते तसेच आजी व माजी मंत्री आहेत. सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या एका माजी मुख्यमंत्र्यांना अनेक कोटींचे अनुदान मिळाले आहे. मतदानाच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात मतदारांना दारू पाजून नशेमध्ये मते घेण्यासाठी राजकीय नेते दारूचा वापर करतात. नशेमध्ये निवडून दिलेले नेते सत्तापदी येऊन स्वत:वरच पैशाची खैरात करीत आहेत. शिवाय अजून पुढच्या निवडणुकीसाठी अधिक दारू निर्मितीची व निवडणूक निधीची व्यवस्था करीत आहेत.
अशा तऱ्हेने दारूमुळे लोकशाहीचा घात होऊन दारूसम्राटांच्या हातात महाराष्ट्र राज्य जात असून जनतेला दारू पिणे, कर भरणे व दारूच्या नशेत मत देणे या भूमिका उरतात. दारूच्या या विषचक्रीय कारस्थानामुळे महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल होईल. महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी विनंती आम्ही मंत्रिमंडळाला करीत आहेत

Wednesday, December 9, 2009

ज्‍वारी-बाजरीपासून दारु बनविण्‍याच्‍या निर्णयाचा रेशनिंग कृती समितीकडून निषेध, हेच धान्‍य रेशनवर देण्‍याची मागणी

मुंबईः ज्‍वारी, बाजरी तसेच मका या धान्‍यांपासून दारु बनविण्‍याच्‍या व त्‍यासाठीच्‍या 23 प्रस्‍तावांना मंजुरी देण्‍याच्‍या राज्‍य सरकारच्‍या निर्णयाचा रेशनिंग कृती समितीने निषेध केला असून हेच धान्‍य रेशनवर देण्‍याची मागणी केली आहे.

ज्‍वारी, बाजरी व मका यांपासून दारु बनविण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतला आहे. त्‍यासाठी आलेल्‍या 45 प्रस्‍तावांपैकी 23 प्रस्‍तावांना मंजुरीही देण्‍यात आली आहे. राज्‍यात 40 टक्‍के लोकांचा, विशेषतः ग्रामीण महाराष्‍ट्राचा ज्‍वारी-बाजरी हा प्रमुख आहार आहे. ही भरडधान्‍ये दारुसाठी वापरली गेल्‍यास या धान्‍यांचा तुटवडा होण्‍याची तसेच किंमती वाढण्‍याचा संभव असून त्‍यामुळे सामान्‍य माणसाच्‍या अन्‍नसुरक्षेला तडाखा बसू शकतो, अशी भीती या निर्णयाचा निषेध करत असताना रेशनिंग कृती समितीने व्‍यक्‍त केली आहे.

आज राज्‍यातील रेशनवर पंजाब-हरयाणासारख्‍या लांबवरच्‍या राज्‍यांतून गहू व तांदूळ मोठा वाहतूक खर्च सोसून आणला जातो. तथापि, इथे पिकणारी व खाल्‍ली जाणारी ज्‍वारी-बाजरीसारखी भरड धान्‍ये रेशनवर दिली जात नाहीत. तांदूळ खाल्‍ला जाणा-या कोकणातही रेशनकार्डधारकांना नको असताना गहू दिला जातो. मध्‍यंतरी केंद्र सरकारने राज्‍यांनी आपल्‍या वाट्याचे अनुदान प्रत्‍यक्ष रकमेत घेऊन आपल्‍या राज्‍यातील लोकांच्‍या आहारातील धान्‍ये स्‍थानिकरित्‍या खरेदी करुन रेशनवर वितरीत करावीत, असा प्रस्‍ताव मांडला होता. त्‍यामुळे भरडधान्‍ये पिकविणा-या सामान्‍य शेतक-यांच्‍या धान्‍यांना भाव मिळणे व गरीब रेशनकार्डधारकांना त्‍यांच्‍या रोजच्‍या खाण्‍यातील धान्‍ये स्‍वस्‍तात रेशनवर मिळणे असा दुहेरी फायदा होणार होता. जवळपास 18 राज्‍यांनी हा प्रस्‍ताव स्‍वीकारला. त्‍यात महाराष्‍ट्र सरकारचा समावेश नाही, ही खेदजनक बाब असल्‍याचे समितीने म्‍हटले आहे. रेशनिंग कृती समिती तसेच अन्‍न अधिकार अभियानासारख्‍या आघाड्यांनी अनेक वर्षे ही स्‍थानिक धान्‍यखरेदीची व त्‍यायोगे रेशनच्‍या विकेंद्रीकरणाची मागणी केंद्र व राज्‍य सरकारकडे लावून धरलेली होती. केंद्राने तयारी दर्शवली असली तरी महाराष्‍ट्र राज्‍य मात्र त्‍यास तयार नाही, याचे खरे कारण त्‍यास या धान्‍याची दारु बनवायची आहे, हे आता स्‍पष्‍ट झाल्‍याचे समितीने म्‍हटले आहे.

हा निर्णय रद्द करुन त्‍याऐवजी हेच धान्‍य रेशनवर देण्‍यासाठी संवेदनशील व्‍यक्‍ती, संघटना व लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन रेशनिंग कृती समितीने केले आहे.

ई-वितरणप्रणाली'ची माहिती 'सकाळ' 'एसएमएस'द्वारे राज्यभरात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 01:07 AM (IST)

जळगाव - जिल्ह्यात रेशनिंग मालासंदर्भात जिल्हा प्रशासनाने ई- वितरणद्वारे सुरू केलेले "कॉल सेंटर' व "एसएमएस' सेवेची माहिती "टीएम- सकाळ'च्या माध्यमातून "एसएमएस'द्वारे मोबाइलधारकांना देण्यात आली. त्यावर तातडीने जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांना प्रतिक्रिया आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाइलवर नागपूर व मुंबईहून आलेल्या प्रक्रियेत ई- वितरणप्रणालीचे कौतुक करण्यात आले आहे, अशी माहिती स्वतः जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी "सकाळ'ला दिली.

शासनमान्य स्वस्त धान्य दुकानांतून कार्डधारकांना वाटप केल्या जाणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण पारदर्शक व्हावे व प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या धान्यासह इतर वस्तूंच्या कोट्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, तसेच त्याविषयी काही तक्रारी असल्यास ती "एसएमएस'च्या माध्यमातून नागरिकांना करण्याची सुविधा जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी (ता. 8) सायंकाळी यासंबंधीच्या "कॉल सेंटर' व "एसएमएस' सेवेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आल्यानंतर आज ती सेवा प्रत्यक्ष कार्यान्वित झाली. ही सेवा सुरू झाल्याची माहिती "टीएम- सकाळ'च्या "एसएमएस' सेवेद्वारे मोबाइलधारकांना पोचविली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने प्रतिक्रिया आल्या.
विदर्भ विकास महामंडळाचे प्रशाकीय अधिकारी दिनेश वाघमारे यांनी "एसएमएस'द्वारे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत "ई-वितरणप्रणाली'ची सेवा यशस्वीरीत्या सुरू केल्याबद्दल अभिनंदन! तर मुंबई मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी सुब्रह्मण्यम यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय ठिकठिकाणांहून त्यांना अभिनंदनाचे "एमएसएम' प्राप्त होत आहेत. "टीएम- सकाळ'च्या "एसएमएस' सेवेचा रिस्पॉन्स आश्‍चर्य वाटावा असा परिणामकारक आपल्याला वाटला, असे जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी "सकाळ'ला सांगितले.

ते म्हणाले, की खऱ्या अर्थाने ही सेवा आज सकाळपासून सुरू झाली. जिल्हाभरातून रेशनिंगच्या पुरवठ्यासंदर्भात नागरिकांच्या 25 तक्रारी आज सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला दूरध्वनी व मोबाइलच्या माध्यमातून मिळाल्या. नागरिकांच्या सोयीसाठी केलेला "कॉल सेंटर'चा उपक्रम यशस्वी झाला; त्याचबरोबर "टीएम-सकाळ'ने राज्यभरातील त्यांच्या मोबाइल "एसएमएस' सेवा घेणाऱ्यांपर्यंत या उपक्रमाचा मेसेज पोचविला, हीदेखील आपल्यासाठी आनंददायी बाब असून, त्यातूनच अभिनंदनाचे मेसेज मला येत आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले