Wednesday, December 9, 2009

ई-वितरणप्रणाली'ची माहिती 'सकाळ' 'एसएमएस'द्वारे राज्यभरात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 01:07 AM (IST)

जळगाव - जिल्ह्यात रेशनिंग मालासंदर्भात जिल्हा प्रशासनाने ई- वितरणद्वारे सुरू केलेले "कॉल सेंटर' व "एसएमएस' सेवेची माहिती "टीएम- सकाळ'च्या माध्यमातून "एसएमएस'द्वारे मोबाइलधारकांना देण्यात आली. त्यावर तातडीने जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांना प्रतिक्रिया आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाइलवर नागपूर व मुंबईहून आलेल्या प्रक्रियेत ई- वितरणप्रणालीचे कौतुक करण्यात आले आहे, अशी माहिती स्वतः जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी "सकाळ'ला दिली.

शासनमान्य स्वस्त धान्य दुकानांतून कार्डधारकांना वाटप केल्या जाणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण पारदर्शक व्हावे व प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या धान्यासह इतर वस्तूंच्या कोट्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, तसेच त्याविषयी काही तक्रारी असल्यास ती "एसएमएस'च्या माध्यमातून नागरिकांना करण्याची सुविधा जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारी (ता. 8) सायंकाळी यासंबंधीच्या "कॉल सेंटर' व "एसएमएस' सेवेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आल्यानंतर आज ती सेवा प्रत्यक्ष कार्यान्वित झाली. ही सेवा सुरू झाल्याची माहिती "टीएम- सकाळ'च्या "एसएमएस' सेवेद्वारे मोबाइलधारकांना पोचविली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने प्रतिक्रिया आल्या.
विदर्भ विकास महामंडळाचे प्रशाकीय अधिकारी दिनेश वाघमारे यांनी "एसएमएस'द्वारे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत "ई-वितरणप्रणाली'ची सेवा यशस्वीरीत्या सुरू केल्याबद्दल अभिनंदन! तर मुंबई मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी सुब्रह्मण्यम यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय ठिकठिकाणांहून त्यांना अभिनंदनाचे "एमएसएम' प्राप्त होत आहेत. "टीएम- सकाळ'च्या "एसएमएस' सेवेचा रिस्पॉन्स आश्‍चर्य वाटावा असा परिणामकारक आपल्याला वाटला, असे जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी "सकाळ'ला सांगितले.

ते म्हणाले, की खऱ्या अर्थाने ही सेवा आज सकाळपासून सुरू झाली. जिल्हाभरातून रेशनिंगच्या पुरवठ्यासंदर्भात नागरिकांच्या 25 तक्रारी आज सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला दूरध्वनी व मोबाइलच्या माध्यमातून मिळाल्या. नागरिकांच्या सोयीसाठी केलेला "कॉल सेंटर'चा उपक्रम यशस्वी झाला; त्याचबरोबर "टीएम-सकाळ'ने राज्यभरातील त्यांच्या मोबाइल "एसएमएस' सेवा घेणाऱ्यांपर्यंत या उपक्रमाचा मेसेज पोचविला, हीदेखील आपल्यासाठी आनंददायी बाब असून, त्यातूनच अभिनंदनाचे मेसेज मला येत आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment